Saturday, October 1, 2016

मनाचा समतोल

एक पिढीच आम्हाला सोडून जात आहे !
वडिलधाऱ्यांची.......
कसे वेगळेच लोक
रात्री लवकर झोपणारे
सकाळी लवकर उठणारे
पहाटे फिरावयास जाणारे
पहाटे अंगण सडा पाहणारे
बागेला पाणी देणारे
देवपूजेसाठी फुले तोडणारे
ते होते कष्टाळू
सडसडीत बांध्याचे
पूजा अर्चा करणारे
पापभिरू ......
मंदिराला जाणारे
रस्त्यात सगळ्यांना बोलणारे
सुख दुखः विचारणारे
दोन हाथ जोडून डोक्यावर नेवून नमस्कार करणारे ....
मंदिरात साष्टांग दंडवत घालणारे
आरत्यामागून आरत्या म्हणणारे
पूजा झाल्याशिवाय अन्नग्रहण न करणारे !
सोबत भाजीसाठी कापडी पिशवी......
झालर लावलेली !
मिरवीत समाधान वाचवलेल्या एक दोन रुपयाचे
त्यांचे जगच कसे सण वार , पै-पाहुणे ,भाजीपाला ,
कडधान्ये ,तीर्थयात्रा ,रिती रिवाज अश्या गोष्टी भोवती फिरणारे !
सेल फोन कधीच वापरता न येणारे
जुन्या फोनचेच कौतुक करणारे
पाच पन्नास फोन च्या डायऱ्या बाळगणारे
आणि नेहमीच चूक नंबर फिरवणारे
आणि चुकून नंबर लागलेल्या नातेवाईकाला.....
तास भर बोलणारे !
दिवस भरात तीन चार वर्तमानपत्रे वाचणारे
विको वज्रदंती आणि मंजन वापरणारे
अंगाला नेहमी बाम चा वास
नेहमीच एकादश्या अन व्रत वैकल्ये
देवावर अन चांगुलपणावर प्रचंड विश्वास ठेवणारे
कस आखुन दिल्यासारखी काटेकोर आयुष्य जगणारे
समाजाची भीती बाळगणारे
सायकल चालवणारे
जुन्या चपला खिळे ठोकून वर्षानु वर्षे वापरणारे
सदरा आखूड होईल म्हणून लांब शिवणारे
सणावाराला अत्तर लावणारे
डिंकाचे लाडू खाणारे
उन्हाळ्यात लोणचे घालणारे
द्रुष्ट काढणारे
अन भाजीवाल्याशी भावावरून हुज्जत घालणारे
पानपुडा बाळगून पान लावून खाणारे
वर्षातून मोजकेच सिनेमे पाहणारे
हे सगळे लोक हळू हळू
सोडून जात आहेत
आणि जाणारही आहेत
त्यांच्यासोबत जाणार एक महत्वाची गोष्ट
ती म्हणजे “समाधानी आयुष्य ’’ !

0 comments:

Post a Comment