Tuesday, September 27, 2016

मानवी मनाचे उत्कट प्रेम

भावनिक अस्थिरतेचा मानवी मनावर पडणारा प्रभाव हा चिरकाल टिकणारा असतो . आयुष्यात आलेले अनुभव व माणसाच्या बदलत्या अपेक्षा यांच्या संयोगाने उत्कट प्रेमाची सुरुवात होते . तसे नित्सिम प्रेम हे माता बालकाच्या रूपात सदोदित फुलत असते परंतु उत्कट प्रेमाच्या सद्य्ना या भिन्न आहेत . जणू एक सुगँधाच्या शोधत मग्न झालेला भुंगा हा कमलाकडे आक्रुश्ट होतो त्याच्यात आपल्याला उत्कट प्रेमाचा रस अनुभवास मिळू शकतो .
मनाला धुंद करणारे व परिस्थितीचे भान हरपून केले जाणारे प्रेम किंवा सुखद क्षणांची अनुभूती ही उत्कट प्रेम दर्शवते .
मनुष्य नेहमी स्वतःला आवडणारया गोष्टी  आपल्या प्रियजनंसोबतच करत असतो . आणी मग अपेक्षानचा  प्रवास सुरू होतो ते थेट उत्कट प्रेमापर्यंत .पण यात अपेक्षा करणारा हा नेहमी उपेक्षितच राहतो कारण टाळी दोन हाताने वाजते हे तो उत्कट प्रेमाच्या आशेने विसरून गेलेला असतो .

मनुष्य भूक लागली म्हणून जसा खाण्याची तरतूद करून ठेवण्याचा प्रयत्न करतो तसच तो प्रेमाची भूक भागवण्यासाठी सतत धडपड करत असतो , वेगवेगळ्या समाजरीतीनुसार ही परम्परा कायम रहते व उत्कट प्रेमाची जणू न पुसलि जाणारी एक ठोस व्याख्या मनुष्य मनावर कोरली जाते आणि मग मनुष्य वाळवंटातील म्रुगजलाच्या शोधासारखा उत्कट प्रेमाची वाट पहात बसतो . यात वय ,सामाजिक परिस्थीती किंवा इतर कोणतेही वर्गीकरण कामत येत नाही फ़क्त मनुष्य हे एकच बिरुद उत्कट प्रेमचा शोध घेत एका ठिकाणी येऊन विसावतो व काही दिवस त्याला ते उत्कट प्रेम मिळते आणी त्याची अपेक्षा वाढण्यास प्रारम्भ होतो . नेमके याच वेळी मनुष्याच्या प्रेमवीशयी सदन्या बदलतात व तो शाश्वत सत्याच्या शोधत आपल्या उत्कट प्रेमाचा शोध करण्याचा प्रयत्न करत असतो .

0 comments:

Post a Comment