मनुष्य समाज हा नेहमी उत्क्रांती करणारा समाज म्हणून समजला गेलेला आहे , सामाजिक परम्परेने आलेली सर्व अगतिकता तो सतत वाहत आसतो , मनाला आनंदाने खुश ठेवण्यात भावनांचा आणि अपेक्षानचा खूप मोठा भाग असतो , भावनिक अस्थिरता ही माणसाला रसातळाला नेते.
अपेक्षा करणे हे पाप नाहीये पण आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वास ठेवणे हे पाप आहे .जणु आपल्या अपेक्षा याच कश्या अवास्तव होत्या याची प्रचिती आपल्याला ही जीवनगाथा सदोदित देत असते .
माणूस नेहमी प्रयत्न करत मोठा होत असतो , त्या प्रयत्नांत मिळालेल्या सफलतेमुळे त्यच्या विश्वासात वाढ होत जाते आणि मग त्याला वाटू लागते की आपल्याला हे मिळाले पाहिजे ते मिळाले पाहिजे आणि काही वेळाने तो असा विचार करू लागतो की माझ्या अपेक्षा या जणू माझ्या मूलभूत हक्कांची ओळख आहे . आणी मग सुरू होतो प्रवास एका न सम्पणार्या घालमेलीचा , मनाची घालमेल परिस्थिती ची घालमेल आणी माणसाची होणारी ओढाताण ,जरी हातची पाचही बोटे सारखी नसतात तरी मनुष्य स्वभावाची पायमूळ ही भिन्न अशा अपेक्षेने जखडली गेलेली आहेत , कुणाला धनाची अपेक्षा कुणाला जमिनीची अपेक्षा कुणाला दोन घास खाण्याची सोय होण्याची अपेक्षा तर कुणाला दोन मिनिट प्रेमळ गूजगोष्टींची अपेक्षा . अपेक्षा करणाऱ्याला नेहमीच असे वाटते की माझी अपेक्षा किती शुल्लक आहे आणी मी तर त्या अपेक्षेला किती पात्र आहे पण खऱ्या परिस्थितीत असणाऱ्या समस्या किंवा योजनांचा अभाव हा माणसाच्या दुःखास कारणीभूत ठरतो . आणी मग माणूस बिनभोबट पणे आपल्याच अपेक्षेला दोषी ठरवत राहतो . आणी परिस्थितीची जाणीव झाल्यावर खंत करत राहण्यापेक्षा तो शाश्वत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो .आणी मग एका महान कार्याची सुरुवात होते , मनाने घेतलेले काम व त्या कामाचा असलेला परिणाम हा त्या माणसाची ओळख बनण्याचा प्रयत्न होतो .
जर एका प्रकारे विचार केला तर अपेक्षा ही समस्या नही तर संधी आहे ,पूर्ण झाली तर आनंद आणी पूर्ण नही झाली तर एक शिकवण व नविन उमेदीची आशा .
माझ्या youtube चॅनेल ला भेट द्या
Www.youtube.com/c/alwayssayiamamazing
0 comments:
Post a Comment