Tuesday, September 27, 2016

मानवी मनाचे उत्कट प्रेम

भावनिक अस्थिरतेचा मानवी मनावर पडणारा प्रभाव हा चिरकाल टिकणारा असतो . आयुष्यात आलेले अनुभव व माणसाच्या बदलत्या अपेक्षा यांच्या संयोगाने उत्कट प्रेमाची सुरुवात होते . तसे नित्सिम प्रेम हे माता बालकाच्या रूपात सदोदित फुलत असते परंतु उत्कट प्रेमाच्या सद्य्ना या भिन्न आहेत . जणू एक सुगँधाच्या शोधत मग्न झालेला भुंगा हा कमलाकडे आक्रुश्ट होतो त्याच्यात आपल्याला उत्कट प्रेमाचा रस अनुभवास मिळू शकतो .
मनाला धुंद करणारे व परिस्थितीचे भान हरपून केले जाणारे प्रेम किंवा सुखद क्षणांची अनुभूती ही उत्कट प्रेम दर्शवते .
मनुष्य नेहमी स्वतःला आवडणारया गोष्टी  आपल्या प्रियजनंसोबतच करत असतो . आणी मग अपेक्षानचा  प्रवास सुरू होतो ते थेट उत्कट प्रेमापर्यंत .पण यात अपेक्षा करणारा हा नेहमी उपेक्षितच राहतो कारण टाळी दोन हाताने वाजते हे तो उत्कट प्रेमाच्या आशेने विसरून गेलेला असतो .

मनुष्य भूक लागली म्हणून जसा खाण्याची तरतूद करून ठेवण्याचा प्रयत्न करतो तसच तो प्रेमाची भूक भागवण्यासाठी सतत धडपड करत असतो , वेगवेगळ्या समाजरीतीनुसार ही परम्परा कायम रहते व उत्कट प्रेमाची जणू न पुसलि जाणारी एक ठोस व्याख्या मनुष्य मनावर कोरली जाते आणि मग मनुष्य वाळवंटातील म्रुगजलाच्या शोधासारखा उत्कट प्रेमाची वाट पहात बसतो . यात वय ,सामाजिक परिस्थीती किंवा इतर कोणतेही वर्गीकरण कामत येत नाही फ़क्त मनुष्य हे एकच बिरुद उत्कट प्रेमचा शोध घेत एका ठिकाणी येऊन विसावतो व काही दिवस त्याला ते उत्कट प्रेम मिळते आणी त्याची अपेक्षा वाढण्यास प्रारम्भ होतो . नेमके याच वेळी मनुष्याच्या प्रेमवीशयी सदन्या बदलतात व तो शाश्वत सत्याच्या शोधत आपल्या उत्कट प्रेमाचा शोध करण्याचा प्रयत्न करत असतो .

Thursday, September 15, 2016

माझी ओळख

Hello 
Mr Rohan Moreshwar  Homkar 
✈from Mumbai ✈working as a lecturer in k.j. somaiya collage  Mumbai .
I am member of national safety council and life member of Indian Society for technical education .
I can successfully conduct various training program's for management related issues , 
business growth , industrial safety ,
disaster management,mentoring for students and parents on effective learning methods.
mastering selling skills,☝mastering Human skills ☝,Time management , ☠industrial safety☠ , businesses growth,©®™business branding and marketing ™®©,fire safety ,disaster management 
And other management related topics
Social media presence
YouTube :-
www.YouTube.com/c/Alwayssayiamamazing
Facebook
Www.Facebook.com/rohanhomkar
Quora
Www.quora.com/rohan-moreshwar-homkar
Reasearchgate
Www.reasearchgate.net/profile/rohan_Homkar
Slideshare
Www.slideshare.net/rohanhomkar/presentations
Linkedin
Www.LinkedIn.com/pub/rohan-homkar/1a/96/741

मानवी मनाचा मागोवा

मनुष्य समाज हा नेहमी उत्क्रांती करणारा समाज म्हणून समजला गेलेला आहे , सामाजिक परम्परेने आलेली सर्व अगतिकता तो सतत वाहत आसतो , मनाला आनंदाने खुश ठेवण्यात भावनांचा आणि अपेक्षानचा खूप मोठा भाग असतो , भावनिक अस्थिरता ही माणसाला रसातळाला  नेते.

अपेक्षा करणे हे पाप नाहीये पण आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वास ठेवणे हे पाप आहे .जणु आपल्या अपेक्षा याच कश्या अवास्तव होत्या याची प्रचिती आपल्याला ही जीवनगाथा सदोदित देत असते .

माणूस नेहमी प्रयत्न करत मोठा होत असतो , त्या प्रयत्नांत मिळालेल्या सफलतेमुळे त्यच्या विश्वासात वाढ होत जाते आणि मग त्याला वाटू लागते की आपल्याला हे मिळाले पाहिजे ते मिळाले पाहिजे आणि काही वेळाने तो असा विचार करू लागतो की माझ्या अपेक्षा या जणू माझ्या मूलभूत हक्कांची ओळख आहे . आणी मग सुरू होतो प्रवास एका न सम्पणार्या घालमेलीचा , मनाची घालमेल परिस्थिती ची घालमेल आणी माणसाची होणारी ओढाताण ,जरी हातची पाचही बोटे सारखी नसतात तरी मनुष्य स्वभावाची पायमूळ ही भिन्न अशा अपेक्षेने जखडली गेलेली आहेत , कुणाला धनाची अपेक्षा कुणाला जमिनीची अपेक्षा कुणाला दोन घास खाण्याची सोय होण्याची अपेक्षा तर कुणाला दोन मिनिट प्रेमळ गूजगोष्टींची अपेक्षा . अपेक्षा करणाऱ्याला नेहमीच असे वाटते की माझी अपेक्षा किती शुल्लक आहे आणी मी तर त्या अपेक्षेला किती पात्र आहे पण खऱ्या परिस्थितीत असणाऱ्या समस्या किंवा योजनांचा अभाव हा माणसाच्या दुःखास कारणीभूत ठरतो . आणी मग माणूस बिनभोबट पणे आपल्याच अपेक्षेला दोषी ठरवत राहतो . आणी परिस्थितीची जाणीव झाल्यावर खंत करत राहण्यापेक्षा तो शाश्वत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो .आणी मग एका महान कार्याची सुरुवात होते , मनाने घेतलेले काम व त्या कामाचा असलेला परिणाम हा त्या माणसाची ओळख बनण्याचा प्रयत्न होतो .

जर एका प्रकारे विचार केला तर अपेक्षा ही समस्या नही तर संधी आहे ,पूर्ण झाली तर आनंद आणी पूर्ण नही झाली तर एक शिकवण व नविन उमेदीची आशा .

माझ्या youtube चॅनेल ला भेट द्या

Www.youtube.com/c/alwayssayiamamazing

मानवी मनातील बदल

मानवी मनाच्या अंतरंगात उसलणरे तरंग हे अपेक्षा आणि विश्वास या वर अवलम्बुन  असतात ,जेंव्हा माणसाला खूप काही मिळते तो त्याची साठवण करतो जणू त्या साठवणीचा सम्बन्ध हा मानवी मनाचा साचा बनवण्यात कारणी भूत असतो .बदल हा देखील मानवी मनाचा एक इंटरेस्टिंग भाग आहे .जो माणूस स्वतःहून करण्यास टाळाटाळ करतो आणि दुसऱ्याने करवा /दुसऱ्यामध्ये व्हावा  अशी खूप अपेक्षा करतो .फक्त अपेक्षा करने हे काही अयोग्य नाही परन्तु  त्या अपेक्षा करणाऱ्या मानसाकडे जेंव्हा पूर्वीचा अनुभव व सामर्थ्याची जोड़ असेल तर त्या अपेक्षा कदाचित पूर्ण होतीलही पण जर त्या अपेक्षा दुसऱ्या माणसाकडून असतील तर मात्र परिस्थिती अस्स्थीर होऊ शकते ,माणसाची मनोवृत्ती बदलण्यात काळ व अनुभव यांचा खूप मोठा सम्बन्ध आहे .

माझ्या youtube चॅनेल ला भेट द्या

Www.youtube.com/c/alwayssayiamamazing

मानवी मनाचा शोध

माणूस म्हणून जन्मला येऊन मी काय केले हा प्रश्न आपल्याला आयुष्यात कधी ना कधी पडणारच . फरक फक्त हा की काहींना हा प्रश्न आयुष्याच्या सुरवातीला पडेल तर काहींना शेवटच्या टप्प्यात !

परंतु हा प्रश्न नुसता पडून चालत नाही तर त्याचे उत्तर शोधायला प्रयत्न करायला हवेत . प्रयत्न केल्यावर उत्तर नक्की सापडेल पण ते कदाचीत नकारार्थी देखील असू शकते . आणी याच ऊत्तराला तुम्ही कश्याप्रकारे समजून घेता हे तुमच्या मनावर व तुमच्या विचारशक्तीवर अवलम्बुन असते .

माणूस म्हणून जन्माला येऊन जर मी फक्त जनावरांसारखी  खाणे ,राहणे ,झोपणे ,व स्वतःचे संरक्षण  करून प्रजा वाढवणे हीच काम करून आयुष्य वाया घालवत असेन तर माझ्या वयाइतकी वर्षे मी वाया घालवली आहेत असे म्हणण्यास हरकत नाही .

माणूस हा एक सामाजीक प्राणी आहे असे म्हणतात परंतु माणसाने त्याचे आयुष्य समाजाच्या हितासाठी खर्चले नाही तर त्याच्या माणूसपणाचा काय उपयोग .

आपण जेंव्हा एखाद्या समस्येमुळे त्रस्त होतो व त्यां त्रासापासून मुक्त होण्याचा काही उपाय शोधून काढतो . त्याचप्रमाणे आपण समाजातील इतर माणसांच्या समस्येवर उपाय शोधून काढायला हातभार लावला पाहिजे .

आज आपण स्वतःहून स्वतःची तसेच आपल्या माणसांची ,वस्तूंची काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपण समाजाच्या हितासाठी आपल्या योगदानस्वरुपी कामाची काळजी केली पाहिजे .

मानवी मनाचा विचार हा नेहमी एका खूप सरळ पध्ध्तीने होत असतो ज्या मध्ये गरज ,माध्यम ,संधी व इच्छाशक्ति यांचा समावेश होतो .

पुढील पोस्ट मध्ये आपण मनाची गरज या विषयी माहिती घेउया .

माझ्या youtube चॅनेल ला भेट द्या

Www.youtube.com/c/alwayssayiamamazing

.