माणूस म्हणून जन्मला येऊन मी काय केले हा प्रश्न आपल्याला आयुष्यात कधी ना कधी पडणारच . फरक फक्त हा की काहींना हा प्रश्न आयुष्याच्या सुरवातीला पडेल तर काहींना शेवटच्या टप्प्यात !
परंतु हा प्रश्न नुसता पडून चालत नाही तर त्याचे उत्तर शोधायला प्रयत्न करायला हवेत . प्रयत्न केल्यावर उत्तर नक्की सापडेल पण ते कदाचीत नकारार्थी देखील असू शकते . आणी याच ऊत्तराला तुम्ही कश्याप्रकारे समजून घेता हे तुमच्या मनावर व तुमच्या विचारशक्तीवर अवलम्बुन असते .
माणूस म्हणून जन्माला येऊन जर मी फक्त जनावरांसारखी खाणे ,राहणे ,झोपणे ,व स्वतःचे संरक्षण करून प्रजा वाढवणे हीच काम करून आयुष्य वाया घालवत असेन तर माझ्या वयाइतकी वर्षे मी वाया घालवली आहेत असे म्हणण्यास हरकत नाही .
माणूस हा एक सामाजीक प्राणी आहे असे म्हणतात परंतु माणसाने त्याचे आयुष्य समाजाच्या हितासाठी खर्चले नाही तर त्याच्या माणूसपणाचा काय उपयोग .
आपण जेंव्हा एखाद्या समस्येमुळे त्रस्त होतो व त्यां त्रासापासून मुक्त होण्याचा काही उपाय शोधून काढतो . त्याचप्रमाणे आपण समाजातील इतर माणसांच्या समस्येवर उपाय शोधून काढायला हातभार लावला पाहिजे .
आज आपण स्वतःहून स्वतःची तसेच आपल्या माणसांची ,वस्तूंची काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपण समाजाच्या हितासाठी आपल्या योगदानस्वरुपी कामाची काळजी केली पाहिजे .
मानवी मनाचा विचार हा नेहमी एका खूप सरळ पध्ध्तीने होत असतो ज्या मध्ये गरज ,माध्यम ,संधी व इच्छाशक्ति यांचा समावेश होतो .
पुढील पोस्ट मध्ये आपण मनाची गरज या विषयी माहिती घेउया .
माझ्या youtube चॅनेल ला भेट द्या
Www.youtube.com/c/alwayssayiamamazing
.
0 comments:
Post a Comment